पतीत पावन संघटनेच्यावतीने काश्मीर पहलगाम येथिल पर्यटकांवरील इस्लामी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध


पुणे : काश्मीर पहलगाम येथिल हिंदु पर्यटकांवरील इस्लामी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी गुडलक चौक डेक्कन येथे पतित पावन संघटनेच्या वतीने पाक पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि पाक लष्कर प्रमुख असिम मुनीर व पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन करुन त्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत निदर्शने करण्यात आली.

या प्रसंगी बोलताना शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर म्हणाले की पाकिस्तानला मोदीजी यांनी चांगला अद्दल घडविण्या साठी आपले सैन्य पाक मध्ये घुसवून पाकिस्तानचे अनेक तुकडे केले पाहिजे असे आव्हान केले.या हल्ल्यात मरण पावलेले नागरिकांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली.

सदर ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, मनोज नायर, गोकुळ शेलार, पप्पू टेमघरे, सुनील मराठे, मनोज पवार, अरविंद परदेशी, विजय गावडे, नीलेश जोशी, रमाकांत गाढवे, राजाभाऊ बर्गे, हराळे पाटील, तेजस पाबळे, सौरभ कुलकर्णी, शंकर बरके, मनोज शिंदे, रोहित चव्हाण, विनोद बागल, सिद्धू लोखंडे, मारुती ननावरे, अक्षय बर्गे, शुभम परदेशी, प्रविण ठाकुर, दीपक परदेशी, नरेंद्र गुप्ता, अनंता जाधव, आशिष बेनकर, शाहरुख नदाफ, गणेश साकरे, सौरभ दुधाने, अरविंद सांबरे, साहिल बामगुडे, रोहित आदमाने, आर्या गावडे, सौरभ पवार, ऋषभ पवार, आदी अनेक जण उपस्थित होते


error: Content is protected !!
नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 8888301363 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें