सर्वसामान्यांचे दुःख दूर करणं हाच माझा धर्म : विधानसभेतील अभिनंदन ठरावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उत्तर
विधानसभा इतर कामकाज
मुंबई दिनांक २४: ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद असून माझ्या राजकीय, सामाजिक जीवनातला हा सर्वोच्च आनंदाचा, समाधानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून सर्वसामान्यांचे दुःख दूर करणं हाच माझा धर्म असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा आद्य जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज विधानसभेत अभिनंदन ठराव मांडला. त्याला उपमुख्यमंत्री शिंदे उत्तर देत होते.
आपल्या छोटेखानी भाषणात उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही. मला आणि माझ्या कामाला कायम आशीर्वाद देणाऱ्या वारकरी आणि शेतकऱ्यांचा तसेच माझ्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावांचा आहे, असं मी मानतो. वंदनीय बाळास
‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद
