नागपूर,दि. 23 : आरोग्य सुविधा सुलभपणे मिळण्यासाठी निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही. आरोग्य सेवेपासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालयात आरोग्य विभागाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी वित्त राज्यमंत्री आशिष जैस्वाल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितिन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, सहाय्यक संचालक प्रमोद गवई, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यावेळी उपस्थित होते.
विभागातील सर्व रुग्णालयात फायर ऑडिट पूर्ण करण्याच्या सूचना करताना आरोग्य मंत्री म्हणाले की, यासंदर्भात याबाबत 31 मार्च रोजी बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले. रुग्णालयात स्वच्छता ठेवा व रुग्णांना योग्य आहार द्या, अशा सूचना आरोग्य मंत्री आबिटक
आरोग्य सेवांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
