भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनात अभिवादन


नवी दिल्ली, १४  : भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक समतेचे प्रणेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.

कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन  केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यानंतर कस्तुरबा गांधी मार्गावरील  महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूणाकृती पुतळ्यास राज्याचे माजी मंत्री श्री. सुरेश खाडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आज साजरी करण्यात आली.  उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.


error: Content is protected !!
नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 8888301363 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें