भावी पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालये सक्षम करू – पालकमंत्री नितेश राणे


दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी दिनांक : पुस्‍तके अथवा ग्रंथ यांच्‍या सारखा दुसरा गुरु नाही, असे म्‍हटले जाते. सामाजिक, शैक्षणिक व सांस्‍कृतिक जीवन समृध्‍द करण्‍यासाठी तसेच वाचन संस्‍कृती वृध्‍दींगत करण्‍यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान महत्‍त्वाचे आहे. भावी पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालये अधिक सक्षम करणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गच्या वतीने दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन सिंधुनगरी येथील आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनामध्ये करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, मुबंई चे प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, मुबंई विभागाचे प्र. सहायक ग्रंथालय संच


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 8888301363 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें