नाशिक : जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने आयोजित गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या राज्यभरातील ४६ शाळांमध्ये नाशिक जिल्ह्यातील वणी येथील मविप्र संचलित आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलची अंतिम फेरीत निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, संचालक प्रवीण जाधव व सर्व संचालक, शिक्षणाधिकारी प्रा. कैलास शिंदे यांनी स्वागत केले आहे.
वर्षभर स्वच्छतेचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे धडे गिरवावे, महात्मा गांधींचे विचार विद्यार्थ्यांनी अंगीकारावेत, ही या स्पर्धेची मुख्य उद्दिष्टे आहेत. त्यासाठी गांधी रिसर्च फाउंडेशनमार्फत सर्व शाळांना भेट देऊन पाहणीअंती सदस्यांकडून शाळेला मूल्यांकन दिले जाते. शनिवारी (दि.२२) या स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या निमित्ताने समन्वयक म्हणून गिरीश कुलकर्णी, चंद्रशेखर पाटील व संजय जाधव यांनी वणी येथे प्रत्यक्ष शाळेला भेट दिली. त्यांनी वर्ग व शा