नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू मराठा हायस्कूलमध्ये जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे होते. व्यासपीठावर अन्य जेष्ठ शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम इयत्ता नववी ई या वर्गाने सादर केला. अक्षरा भवर हिने जल दिनानिमित्त कविता सादर केली. विद्यार्थिनींनी फलकांद्वारे ‘पाणी वाचवा’चा संदेश देत पाणी बचतीचे आवाहन केले.
ज्ञानेश्वर शिंदे यांनी अध्यक्षीय मनोगत मांडले. वैष्णव आहेर याने सूत्रसंचलन केले तर प्रांजल बागल हिने आभार मानले. रुपाली शेडगे यांनी सुंदर फलक लेखन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.