पहिल्या ‘वेव्हज् परिषदे’चा मान महाराष्ट्राला दिल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे उपमख्यमंत्री अजित पवार यांनी मानले आभार


पहिल्या ‘वेव्हज् परिषदे’चा मान महाराष्ट्राला दिल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे उपमख्यमंत्री अजित पवार यांनी मानले आभार

पुणेदि. ०१: देशातील पहिली वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲन्ड एंटरटेन्मेंट समिट’ अर्थात वेव्हज् परिषद’ आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आभार मानले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर आपल्या मनोगतात त्यांनी ही भावना व्यक्त केली.

यावेळी आमदार बापुसाहेब पठारेविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारपुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेजमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसेपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेशिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंहक्रीडा व युवक सेवा आयुक्त सुरज मांढरेसाखर आयुक्त सिद्धाराम सालीमठमहामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, ‘पीएआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसेजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपोलीस अधीक्षक पंकज देशमुखजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटीलस्वातंत्र्यसैनिक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीविविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारीज्येष्ठ नागरिकविद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

 उपमुख्यमंत्री पवार म्हणालेयंदाचा महाराष्ट्र दिन आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीतदेशाच्या आर्थिक राजधानीतमहानगरी मुंबई येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्हज परिषदेचे उद्घाटन हस्ते होणार असून याचा समस्त महाराष्ट्रवासीयांना मनापासून आनंद आहे.


error: Content is protected !!
नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 8888301363 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें