नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाचा सन २०२४-२५ चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि.५) सकाळी ९:३० वाजता कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रचे माजी विद्यार्थी इंडियन आयडॉल सुप्रसिद्ध गायक प्रतिक सोळसे तर अध्यक्षस्थानी मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची उपस्थिती राहणार आहे.
याप्रसंगी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे यांच्यासह सर्व संचालक, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव व सर्व शिक्षणाधिकारी, उपप्राचार्य, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी नेट-सेट ,पीएचडी उत्तीर्ण प्राध्यापक यांचा सत्कार तसेच पुणे विद्यापीठात विशेष गुणवत्ता यादीत आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, विविध खेळातील गुणवंत खेळाडू, विशेष पुरस्कारप्राप्त विद्यार्थी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल, अशी माहिती प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी दिली.