पुणे विद्यापीठाच्या स्टार्टअप ऑलिम्पियाड स्पर्धेत मविप्र वास्तुकला महाविद्यालयाचा डंका!


नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित ‘स्टार्टअप ऑलिम्पियाड २०२५’ स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या ४०० प्रवेशिकांपैकी मविप्र संचलित आर्किटेक्चर महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘ओनियन स्टोरेज सिस्टिम’ या मॉडेलची अंतिम सहा संघांमध्ये निवड झाली आहे. विद्यापीठातर्फे महाविद्यालयाला पारितोषिकाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्यूबेशन व एंटरप्राइज यांच्यातर्फे महाविद्यालय स्तरावर ‘स्टार्टअप ऑलिम्पियाड २०२५’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ४०० पेक्षा जास्त संघांनी सहभाग घेत नावीन्यपूर्ण मॉडेल्स सादर केले होते. यापैकी निवडक २६ संघांच्या मॉडेल्सची निवड करण्यात आली. या २६ संघांनी तज्ज्ञांसमोर आपल्या मॉडेल्सबद्दल प्रत्यक्ष सादरीकरण केले. त्यातून मविप्र आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या प्रॉडक्ट ॲण्ड डिझाइन या विभागातील पाच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘ओनियन स्टोरेज सिस्टिम’ अर्थात, कांदा साठवणूकसंदर्भातील उपकरणाची अंतिम सहामध्ये निवड करण्यात आली. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत नाविन्यपूर्ण आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे असे हे उपकरण कांदा साठवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
उपासना सपारिया, समृद्धी संचेती, शुभम भामरे, राम लोहार, सोहम अंबावणे या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्राजक्ता बस्ते, विभागप्रमुख स्मिता कासार, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. प्राजक्ता वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे मॉडेल्स तयार केले. याबद्दल मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते मध्यवर्ती कार्यालयात सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मविप्रचे शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे उपस्थित होते.
सह्याद्री फार्मचा पुढाकार
शेतकरी हित लक्षात घेऊन मविप्रच्या आर्किटेक्चर महाविद्यालयाने तयार केलेल्या मॉडेल्सला स्टार्टअपच्या प्रत्यक्षात आणण्यासाठी नाशिकमधील सह्याद्री फार्म कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आवश्यक खर्च करण्याची तयारीदेखील काम्नीने दाखविली आहे.


error: Content is protected !!
नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 8888301363 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें