अजितदादा पवार यांचे मविप्र कार्यकारिणीला मोलाचे मार्गदर्शन
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नूतन कार्यकारिणीने दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना. अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व विकासात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी निफाडचे आमदार दिलीपराव बनकर, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर तसेच चांदवडचे संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी ना. अजितदादा पवार यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत नूतन कार्यकारिणीस संस्थेच्या भावी वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेच्या गुणवत्ता वृद्धी, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम व शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

