कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केली सिन्नर बसस्थानकाची पाहणी


नाशिक, दि. , 28 मे 2025  सिन्नर शहरात 25 मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सिन्नर बसस्थानकाच्या गॅलरीचा स्लॅब कोसळून स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसचे नुकसान झाले होते. आज कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर बस स्थानकास भेट देऊन पाहणी केली.
यावेळी समवेत मुंबईचे महाव्यवस्थापक स्थापत्य दिनेश महाजन, विभाग नियंत्रक  श्रावण सोनवणे, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, कल्याणी ढगे, आगर व्यवस्थापक हेमंत नेरकर, विभागीय स्थापत्य अधिकारी  चैताली भुसारे, स्थानक प्रमुख सुरेश पवार आदी उपस्थित होते.
बसस्थानकाच्या नुकसान झालेल्या भागाचे नवीन बांधकाम करण्यासाठी तातडीने अंदाजपत्रक सादर करावे. तसेच बस स्थानकाच्या छतावर पावसाचे पाणी साठणार नाही यादृष्टीने पाण्याचा निचरा होण्यासाठी जास्तीत जास्त आउटलेटचा अंदाजपत्रकात समावेश करावा, अशा सूचना कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

error: Content is protected !!
नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 8888301363 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें