भुजबळ नॉलेज सिटी MET, आडगाव, नाशिक येथिल मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांची प्लेसमेंट मधे उत्तुंग भरारी, 92 टक्के विद्यार्थ्यांची निवड


भुजबळ नॉलेज सिटी आडगाव, नाशिक येथिल एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग मधिल मेकॅनिकल विभागाच्या विद्याथ्याना नोकरिसाठीच्या मुलाखाती अंतर्गत (कॅम्पस प्लेसमेंट) नामांकित कंपनीत नोकरीची संधी भेटलेली आहे. मुलाखात पर्वात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय आशा एकूण 38 नामांकित कंपनीने महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातून विद्यार्थांना निवडून नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. एकूण विद्यार्थ्यांच्या 92 टक्के विद्यार्थ्यांची कॉलेज कॅम्पस प्लेसमेंट मधुन 38 नामांकित कंपनी मध्ये निवड करण्यात आली.या वर्षीच्या मेकॅनिकल बॅच मध्ये सर्वाधिक वेतन वेदांता पॉवर सोलुशन्स कंपनीकडून रवींद्र शिंदे, प्रथम वाघ, हिमांशू बडगुजर, रोहित वाघमारे आणि हर्षल भामरे यांना मिळाले असून, नितीन शेवाळे, प्रियंका शिंदे, स्नेहल मुळूक (महिंद्रा अँड महिंद्रा), महेश सोनवणे, प्रथमेश नवसे, विशाल कापसे, आदर्श (विप्रो पारी), शिवम सावंत (इंडोव्हान्स), दर्शन पगार (मॉरफिने) आणि सिद्धेश टाकणे, अजित महाजन, ईश्वर अहिरे, प्रणव नवले (रीथमसॉफ्ट),शैलेश, योगेश, सुरज (मेकवेल), अंश, शोबीत, आर्यन (JLL) आणि हृषीकेश खोले (रिषभ) यांना चांगले पॅकेज मिळाले असून नोकरीची संधी महाविद्यालयाच्या Training and Placement Cell ने उपलब्ध करून दिली. तसेच अजूनही काही कंपण्यांचे निकाल बाकी आहेत . तसेच प्राईम ग्राफाईट, आमटेक टेक्नॉलॉजी , फोर्स मोटर, रिंग प्लस अक्वॉ ,फोर्विया, ऊर्जन सोलर, स्लाइडवेल, रिलायेबल, सियाट, samsonite, अशा अनेक कंपन्यांनी विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली.
संस्थेमधील उपलब्ध असलेल्या इंटर्नशिप, प्रशिक्षण सत्र, विषय तज्ञाचे मार्गदर्शन आणी इतर विविध गुणवत्ता सुधारणांच्या योजनाचा विद्यार्थांना फायदा झाला असून त्यांनी उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा पुर्ण केल्या आहेत. संस्थेचे विश्वस्थ समीर भुजबळ, संस्थेच्या मार्गदर्शिका डॉ. शेफाली भुजबळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार वाणी, अणि मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. श्यामकुमार काळपांडे यानी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्लेसमेंट विभागाचे प्रा.विशाल चौधरी, प्रा.जसप्रीत कौर आणि प्रा.डॉ. वैभव दाभाडे यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच वर्गशिक्षक प्रा. नितीन अहिरे आणि प्रा. निलेश ह्याळीज , समस्त मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक यांनीही मुलांना मार्गदर्शन केलेत.

 


error: Content is protected !!
नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 8888301363 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें