नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयात हेल्प द ब्लाइंड फाउंडेशन चेन्नई यांच्या सहकार्याने अंध विद्यार्थ्यांना किबोर्ड तसेच सेलफोन कनेक्टर यांचे मोफत वितरण करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपले भवितव्य यशस्वी करण्याचा सल्ला दिला. हेल्प द ब्लाइंड फाउंडेशन चेन्नईच्या पूजा बॉम्ब यांनी त्यांच्या संस्थेविषयी व कार्यशाळेसंदर्भात माहिती दिली. याप्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. तुषार पाटील, प्रशिक्षक हंसिनी आंबेकर, सुहास होळकर, शफी शेख, पवन आखाडे आणि लाभ घेतलेले अंध विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. तुषार पाटील यांनी केले.