लोकनेते व्यंकटराव हिरे स्वायत्त महाविद्यालयात रिसर्च मेथोडॉलॉजी या विषयावर कार्यशाळा संपन्न


नाशिक (प्रतिनिधी): महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व संशोधन केंद्राच्यावतीने पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संशोधन पद्धती या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये संशोधन हा विषय अत्यंत महत्वाचा असून अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमा बरोबरच स्पर्धा परीक्षेचीही तयारी करून यश संपादन करावे असेही मा. प्राचार्य यावेळी म्हणाले.

डॉ. एलमामे यांनी “संशोधन पद्धती” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. त्यांनी संशोधन समस्येची निवड, उद्दिष्टे निश्चिती, माहिती संकलन पद्धती, विश्लेषण तंत्रे, निष्कर्ष मांडणी या महत्त्वाच्या टप्प्यांचे सविस्तर स्पष्टीकरण केले. तसेच विद्यार्थ्यांनी संशोधन करून समाजहितासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यशाळेत अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. ना. ना. गाढे यांनी रिसर्च प्रोजेक्ट लिखाणातील बारकावे सांगून रिसर्च पेपर कसा लिहावा व प्रसिद्ध करावा यासंबंधी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे आयोजन उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रमोद आंबेकर, पर्यवेक्षक प्रा. डॉ. सरला सानप यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

याप्रसंगी पदव्युत्तर वर्गातील मेघानी भरसट या विद्यार्थिनीची बी.एस.एफ. निवड झाल्याबद्दल, नितीन पवार यांची एम.एस. एफ. मध्ये आणि युवराज बागुल याची दिल्ली येथील टी. आर. टी.आय.- यू. पी.एस. सी. परीक्षेच्या क्लासेससाठी निवड झाल्याबद्दल मा. प्राचार्य डॉ. जगदाळे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. गाढे यांनी केले तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचयही करून दिला. प्रा. मयूर गवळी यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. रुपाली देवरे, डॉ. प्रिती काळे, प्रा. मयूर गवळी,

प्रा. चेतन गवळी, यासह अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी परिश्रम घेतले. या कार्यशाळेस . प्रा. डॉ. ॲड. भगवान निवृत्ती एलमामे व प्रा. डॉ. ना. ना. गाढे यांनी मार्गदर्शन केले.


error: Content is protected !!
नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 8888301363 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें