द्वारका येथे भुयारी मार्गाच्या खोदकामात प्राचीन विहीर सापडली


2027 च्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पुणे–नाशिक महामार्गाच्या कामादरम्यान ऐतिहासिक बांधकामाचा शोध

नाशिक : (प्रतिनिधी संतोष चौधरी) 
आगामी 2027 मधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या विविध पायाभूत विकासकामांदरम्यान एक ऐतिहासिक अवशेष समोर आला आहे. पुणे–नाशिक महामार्गावरील द्वारका परिसरात प्रस्तावित भुयारी मार्गाच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान दगडी बांधकाम असलेली अतिप्राचीन विहीर आढळून आली आहे.

कामगारांकडून खोदकाम सुरू असताना जमिनीखाली दगडी बांधकामाची रचना दिसून आली. पुढील खोदकामात ही रचना विहिरीची असल्याचे स्पष्ट झाले. विहिरीचे बांधकाम पद्धत आणि वापरलेले दगड पाहता ती खूप जुन्या कालखंडातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे, या विहिरीचे बांधकाम पाहता ती भारतीय प्राचीन स्थापत्य शैलीचा उत्तम नमुना असल्याचे प्राथमिक निरीक्षणात दिसून येत आहे. त्यामुळे इतिहास, स्थापत्यशास्त्र आणि पुरातत्त्व विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही रचना अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते, असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या विहिरीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता पुरातत्त्व विभागाकडून तपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या विहिरीच्या सापडण्यामुळे भुयारी मार्गाच्या कामावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाकडून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या कामांदरम्यान सापडलेला हा पुरातन अवशेष नागरिकांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरला आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 8888301363 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें